सेलू प्रतिनिधी
परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबईचे ५२ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन शनिवारी दि.१९ व रविवारी दि.२० जानेवारी रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनानिमित्त छत्रपती राजर्षी शाहू स्मारक परिसरात उभारण्यात येत असलेल्या डॉ.अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलनगरीत दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी दि.१९ रोजी सकाळी आठ वाजता बिंदू चौक ते छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौकापर्यंत ग्रंथ दिंडी व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध गायक सोमनाथ परब दसरा समूहगान घेणार आहेत. शाहीर कुंतिनाथ करके-पाटील अध्यक्षस्थानी असतील. सकाळी साडे अकरा वाजता " महिलांचे प्रश्र्न " या विषयावर परिसंवाद आहे. अध्यक्षस्थानी डॉ.नूतन माळवी (वर्धा ) ह्या असतील. यात मेघा पानसरे, पल्लवी कोरगांवकर, तनुजा शिपूरकर, वंदना काशिद, सुचिता पडळकर ( कोल्हापूर ) व कमलताई परूळेकर ( सिंधुदुर्ग ) सहभागी होणार आहेत.
दुपारी तीन वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी कथामालाचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधूत म्हमाणे, तर विशेष अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.तारा भवाळकर, प्रा.शामराव पाटील, ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा, जयवंतराव ठाकरे, प्रा.दशरथ सगरे , डॉ.प्रवीण हेंद्रे, महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, अशोक जाधव, राजू लाटकर, डॉ.शरद साळुंखे, गणीसाहेब आजरेकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल. सायंकाळी सात वाजता कथामालेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. रात्री साडेआठ वाजता विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवारी दि.२० जानेवारीला नवीन कार्यकारिणीची निवड होणार आहे, तर सकाळी दहा ते अकरा या वेळेत " महात्मा गांधी काल, आज आणि उद्या " या विषयावर डॉ.सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे. यात प्रा.किसनराव कुराडे, सुरेश शिपूरकर , डॉ.टी.एस.पाटील, एम.एस.पाटोळे, शिवाजीराव परूळेकर सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय अध्यक्ष अवधूत म्हमाणे, पन्नालाल सुराणा, विश्वस्त जयंत मठकर, कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील, प्रमुख कार्यवाह शामराव कराळे, कोषाध्यक्ष कांतीलाल गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले अधिवेशन व प्रतिनिधींच्या मनोगतांनी समारोप होणार आहे. अधिवेशनास कथामाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाड्यातील शाखा पदाधिकारी श्रीमती कल्पना दत्तात्रेय हेलसकर, डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, आर.आर.जोशी, समन्वयक श्री डॉ.व्यंकटेश चौधरी , रामलिंग तत्तापुरे, सुनील साबळे वाय.जी.बेंबडे , संगीता देशमुख जी.सी.नेरे, विजय वायाळ, प्रमोद देशमुख , सतीश कुलकर्णी, मंताजी ढाकरे, मधुकर काष्टे, दिलीप श्रृंगारपुतळे आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें