तालुकास्तरीय समूह नृत्य,गीत गायन स्पर्धेत नूतन विद्यालय प्रथम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 17 जनवरी 2019

तालुकास्तरीय समूह नृत्य,गीत गायन स्पर्धेत नूतन विद्यालय प्रथम.



सेलू प्रतिनिधी

सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानावर गुरूवार ( दि.१७ ) रोजी परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आयोजित तालुकास्तरीय गीत गायन,समुह नृत्य स्पर्धेत नूतन विद्यालय प्रथम तर नूतन कन्या प्रशालेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. समुह गीतात श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय तर समूह नृत्य स्पर्धेत शारदा विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. कथाकथन आणि सामान्य ज्ञान स्पर्धेत नूतन कन्या प्रशाला,नूतन विद्यालयाने अनुक्रमे प्रथम,द्वितीय तर केशवराज बाबासाहेब विद्यालय आणि शांताबाई नखाते माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तालुकास्तरीय समुह नृत्य,गीत गायन,सामान्य ज्ञान आणि कथाकथन स्पर्धेचे उद् घाटन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालूका शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रमेश नखाते,संगीता खराबे  टाकळकर,उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले यांची उपस्थिती होती. गंगाधर कान्हेकर,दिगंबर रोकडे,सुमिता सबनीस,सारीका जोशी,आश्विनी कुलकर्णी,रेणुका अग्रवाल,पुजा तोडकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालूका शिक्षण संवर्धन मंडळाचे सचिव मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे यांनी केले.सुञसंचालन काशिनाथ पल्लेवाड यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश हिवाळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालूका शिक्षण संवर्धन मंडळाचे समन्वयक सुधीर जोशी,अतुल पाटील,धापसे,शशांक पांडे यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें