परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची बैठक संपन्न.
परभणी (जिल्हा प्रतिनिधी )
महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवून महिला संघटन मजबुतीकरणासाठी तालुका निहाय महिलांच्या बुथ कमीट्या स्थापन करण्याचे महत्वपूर्ण मिशन रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा सौ भावनाताई नखाते यांनी हाती घेतले असुन त्यांनी या उपक्रमा बाबत सर्व तालूका महिलाध्यक्षा यांना सुचित केले आहे . यामुळे एकप्रकारे महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला रा.काँ.पार्टी च्या बैठकीत शिक्कामोर्तब केले.
परभणी येथे राष्ट्रवादी भवनात जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने तालुका महिलाध्यक्षांची बैठक महिला जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांच्या अध्यक्षतेखाली ७ जानेवारी रोजी घेण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करतांना महिला जिल्हाध्यक्षा सौ भावनाताई नखाते म्हणाल्या की,महिला ह्या घरातील संसाराची जबाबदारी निश्चितपणे यशस्वी पार पाडतात कारण त्यांचे महिलांमध्ये ते गुण असतात.राजकारणातही महिलांचे योगदान महत्वपूर्ण असुन ग्रामीण भागात महिलांचा राजकिय सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलांची बुथ कमिटीवर निवड करण्याचे मिशन हाती घेतले असुन सर्व महिला तालकाध्यक्षांनी कामाला लगावे असे अवाहन यावेळी भावनाताई नखाते यांनी केले.तसेच शहरात व प्रत्येक गावागावात महिलांसाठी सेप्टी आँडीट हि संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीसाठी तालुका अध्यक्षा वनिता चव्हाण ,मनिषा केंद्रे,मीरा वानखेडे,इंदू तारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी महिला तालुकाध्यक्षा संघमित्रा कांबळे ,अश्विनी बगल,सीता घाटूळ, गीता कुटे,अयोध्या मोगल,शोभा शिंदे,लक्ष्मी झिंजान यांच्यासह महिला पदाधिकार्यांची उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें