विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.


सेलू / प्रतिनिधी
 शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त श्री के.बा. विद्यालय, सेलू यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता ३ री व ४ थी साठी रंगभरण स्पर्धेत कु.चैताली काकडे ( प्रथम ) , कु.समृद्धी मुळी ( तृतीय ) , इयत्ता ५ वी स्कॉलरशिपवर आधारीत सामान्यज्ञान स्पर्धेत चि. अनिकेत राऊत ( प्रथम ) , चि . शिवतेज गायकवाड ( तृतीय ) , इयत्ता ८ वी स्कॉलरशिपवर आधारीत सामान्यज्ञान स्पर्धेत कु .साक्षी शिंदे ( द्वितीय ) , इयत्ता ६ वी , ७ वी साठी समुहगीत गायन स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाच्या विध्यार्थी संचाने द्वितीय क्रमांक पटकावला. या संचात अनुजा फंड , प्रतीक्षा कायंदे , तृप्ती धरणे , आरती घुले ,ऋतुजा नाईकनवरे ,श्रीनिधी कुलकर्णी ,हर्ष जोशी ,साक्षी जोशी ,प्रतीक्षा फंड ,अस्मिता रोकडे ,सुमेध देशमुख ,व्यंकटेश कुलकर्णी , सायली मुळी यांचा सहभाग होता .
यशस्वी विध्यार्थ्यांचे कार्यवाह किरणराव डूघरेकर ,शालेय समिती अध्यक्ष सुधीरराव चौधरी, मु.अ. बळवंत देशमुख तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें