नाभिक समाजाचा मुक मोर्चा.करपेवाडीच्या जिल्हा साताराच्या खूनातील आरोपीना अटकेची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 जनवरी 2019

नाभिक समाजाचा मुक मोर्चा.करपेवाडीच्या जिल्हा साताराच्या खूनातील आरोपीना अटकेची मागणी.




सोनपेठः येथील नाभिक समाजाने करपेवाडी जिल्हा सातारा येथील भाग्यश्री संतोष माने हिच्या मारेक-यांना अटकेच्या मागणीसाठी नाभिक समाजाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त करून तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले.

       करपेवाडी ता पाटण जि सातारा येथील नाभिक समाजातील अल्पवयीन मुलगी भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने हिचा धारदार शस्ञाने 22 जानेवारी रोजी गळा चिरून खून करण्यात आला होता. सदर खूनाचा शोध लावून आरोपींना गजाआड करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

      शहरातील संत सेना महाराज चौका पासून सकाळी 11 वाजता मुक मोर्चा सुरुवात झाली तसेच पुढे टिपू सुलतान चौक, शहिद मुंजाभाऊ तेलभरे चौक, छञपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला यावेळी नाभिक समाजाने नारायण पिंपळे यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनावर ज्ञानोबा वाघमारे, प्रल्हाद दळवे, अशोक सुरवसे, कारभारी दळवे, बालाजी मस्के, रमेश दळवे, बालाजी सुरवसे, ज्ञानेश्वर दळवे, अर्जुन राऊत, किरण मस्के, भगवान राऊत, दत्ता पारवे, नरहारी सुरवसे, विष्णू मस्के, हरिभाऊ राऊत, पांडूरंग आतखाने, मदन राऊत, बाबा खाडे, सुनिल दळवे, चंद्रकांत गंगोञे, कृष्णा घुले, संतोष मस्के, विलास पंडीत, महादू मस्के, सिताराम आतखाने, दत्ता सुरवसे, राजेश आतखाने, रामप्रसाद दळवे यासह नाभिक बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें