एम आई एम चे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार चे आमरण उपोषणाला यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 जनवरी 2019

एम आई एम चे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार चे आमरण उपोषणाला यश.

नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय कडून लेखी आश्वासन.


सिल्लोड ()सिल्लोड येथील ट्राम सेंटर सुरु करण्यात यावा,रुग्णालयात सोनोग्राफी ची सुविधा देण्यात यावी,गुम्मट जोहर कॉलोनी कॉलोनी येथील नलिया व रस्ते नवीन तय्यार करण्यात याव्या,जमालशाह कालोनी व गुम्मट परिसरात मुस्लिम समाजासाठी मंगल कार्यालय बांधण्यात यावा तसेच सर्वे नंबर 85 मधील अवैध रित्या बांधण्यात आलेली भिंत काढण्यात यावी या सर्व मुख्य मागण्यासाठी एम आई एम चे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार(बबलू) हे दिनांक २५ रोजी उप विभागीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्या या उपोषणाला दोनच दिवसात यश मिळाले दरम्यान उप विभागीय अधिकारी निरुती गायकवाड यांनी त्याची भेट घेऊन आश्वासन दिले होते मात्र लेखी आश्वासन नसल्याने त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले दिनांक २६ रोजी प्रजासत्ताक दिन या दिवशीही यांचा उपोषण सुरु होता या उपोषणाची दाखल घेऊन औरंगाबाद येथील स्वील सर्जन डॉ.सुंदर कुलकर्णी डॉ.नाईकवाडे व वैधीक्य अधीक्षक डॉ.सरदेसाई यांनी शेख बबलू यांची भेट घेऊन ट्राम सेंटर लवकरात लवकर सुरु करण्यात येईल तसेच येत्या सात दिवसाच्या आत सोनोग्राफी सुविधा कोणत्याही प्रस्थित रुग्णांना देण्यात येईल किवा खासगी डॉक्टर कडून हि सेवा करून घेऊ अशी लेखी आश्वासन दिले.या शिवाय नगर परिषद कडून त्या मागणी वर ठराव घेऊन ते काम केले जाईल अशे आश्वासन मिळाले त्यांचे उपोषणाला तालुका अध्यक्ष  बनेखा पठाण,प्रभाकर पारधे,शेख इम्रान,अन्वर पठाण,शेख रफिक,सय्यद शमीम रजवी,अशोक सोनावणे ,फहीम पठाण,अशोक गायकवाड,वकील शेख ऊसमान ,शेख खलील,शेख फिरोज, शेख शाकेर,नज़ीर अहमद,साजीद खासाब, अ.हामिद,एस नासिर ,आदींनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें