सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील खेडा दू. की. या ग्रामपंचायतीमधील ती सदस्यानी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने या तिन्ही सदस्यांना पदावरून निरहे ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले आहेत विलास पंढरीनाथ भुजबळ यांनी याबाबत अर्ज केला होता त्यांच्या तर्फे ॲड. पी.डी. गिराम यांनी काम पाहिले अपात्र ठरलेल्या सदस्यांमध्ये दत्ता सोनाजी काळे, रेणुका सोनाजी काळे, लक्ष्मीबाई घनश्याम सोनवणे यांचा समावेश आहे यातील दत्ता सोनाजी काळे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग रेणुका सोनाजी काळे या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि लक्ष्मीबाई सोनवणे या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून विजयी झाल्या होत्या ग्रामपंचायत निवडणुकीत नमुद सदस्यांनी नामनिर्देशनपत्र सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर करण्यात येईल असे शपथपत्र दिले होते निवडून आल्यानंतर त्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करावे अशी अपील अर्ज विलास भुजबळ यांनी केला होता या युक्तिवाद झाला खेडा दु.की. ची ग्रामपंचायत निवडणूक २० १५ साली पार पडली होती. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडून येऊन विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गुरुवार २४ जानेवारी रोजी आदेश देत दत्ता काळे, रेणुका काळे, लक्ष्मीबाई सोनवणे यांचे ग्रामपंचायत सदस्य पद निरहे ठरविले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें