महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसच्या चलो पंचायत अभियानाचा सिल्लोडला शुभारंभ ;
राज्य आणुया काँग्रेसचे - राज्य आणुया शेतकऱ्यांचे - बेरोजगारी हटवुया - युवकांना सशक्त बनवुया ;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०४ ) - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित चलो पंचायत अभियानाचा शुभारंभ व पत्रकचे विमोचन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी केले.
अभियान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली.
चलो पंचायत अभियानाची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी युवकांना दिली. काँग्रेसचे सरकार आल्यावर गरजू बेरोज़गाराना मासिक भत्ता,जिल्हा रोज़गार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे सक्षमिकरण , मूली व महिलासाठी अधिकाधिक वस्तिगृहांची निर्मिति करण्यात येईल ,कमी व्याजाने व सुलभ शैक्षणिक कर्ज़,खास युवकांसाठी विनातारन व बिनव्याजी व्यासायिक कर्ज़ अशी सर्व माहिती बेरोज़गार युवकांना देण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक युवकांचे मोबाईल नंबर ने ९९१०२२२०१९ या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देण्यात येत असुन बेरोजगांराचे (युवा शक्ति) कार्ड भरण्यात येत आहे.
भाजप सरकारने जी आश्वासने दिली होती ते पुर्ण झाली का ? होय/ नाही (रियलिटी चेक कार्ड) द्वारे भरण्यात आले.
चलो पंचायत अभियानास सुरुवात करण्यात आली असून जिल्हाभर राबविण्यात येत असलेले अभियान एक ते दिड महिना चालणार असून अभियानप्रसंगी ठिक ठिकाणी युवक काँग्रेसच्या शाखा उघड़ण्यात येणार आहे.
चलो पंचायत अभियानात युवक काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
माहिती पत्रकाचे उदघाटन....महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित चलो पंचायत अभियान माहिती पञकाचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी मुक्तदिर देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, चेअरमन रमेश साळवे, अब्दुल आमेर, अमित आरके, मतीन देशमुख, सांडू मिर्झा, अकिल देशमुख, कुणाल सहारे, रमेश एंडोले, मनोज झवर, आशिष कटारिया, कुणाल गौर, अक्षय मगर, मनोज कोठाळे, गौरव सहारे, आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें