भोकरदन प्रतिनिधी.
--------------------------
आज दिनांक 4 जानेवारी शुक्रवार रोजी भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या महत्त्वाच्या बैठकीला येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकारांना मुद्दामहून डावलले शिवाय या पाणीटंचाई सारख्या महत्त्वाच्या बैठकीला तालुक्यातून असंख्य नागरिकांची उपस्थिती महत्त्वाची असतांनादेखील या बैठकीला नागरिकांचाही प्रतिसाद दिसून आला नाही.
दरम्यान मतदारसंघा मधील दुष्काळाची तीव्रता व पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता आमदार संतोष पाटील दानवे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने बैठक लावून या बैठकीबाबत सुचित केले होते त्यानुसार आवाज शुक्रवार रोजी येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये तालुक्यातील पाणीटंचाईबाबत पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उपविभागीय अधिकारी तहसीलदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीच्या सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध गावांचा तीव्र पाणीटंचाई आढावा घेतला असता यात काही कामचुकार अधिकारी कर्मचारी हलगर्जीपणा व आहे काय करीत असल्याचे आमदार संतोष दानवे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून खडे बोल सुनावले व यापुढे पाणीटंचाई काळामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने क ड क कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही यावेळी आमदारांनी दिला. अति महत्त्वाच्या या बैठकीला पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक पत्रकारांना तर डावललेच पण काही गावांच्या सरपंचांनाही याबाबत कल्पना नसल्याचे समजते. बैठकीमध्ये आपली फजिती होऊ नये यासाठीच डावलल्याचे बोलले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें