शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
येथील संजय गणपत कानडे यांचे चिरंजीव सुशांत व एकनाथ वाल्हुबा इल्हे यांची कन्या वृषाली यांच्या शुभविवाहात सत्काराला फाटा देवुन त्यांनी व त्यांचे दाजी गुर्मीत डडीयाल, कैलास बोरावके यांनी पंधरा मुलींचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च उचलुन त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले. स्नेहलता कोल्हे यांनी समाजिक जबाबदारीचे भान ठेवुन कानडे व इल्हे कुटूंबियांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, कोपरगांव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे कैलास बोरावके,गुर्मीत डडीयाल, गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर संजय कानडे ,आकाश बोरावके ,गणेश कानडे
आदी उपस्थित होते. या शुभविवाह सोहळयात सहभागी झालेल्या सर्व व-हाडी मंडळींना बेटी बचाओ बेटी पढाओ संदेशाच्या टोप्या वाटण्यांत आल्या. त्यामुळे या विवाह सोहळयास एक वेगळेच रूप पहावयास मिळाले. आमदार स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, आज बहुतांष ठिकाणी मुलगा मुलगी असा भेदभाव पहावयास मिळतो. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर घरकामाची जबाबदारी टाकण्यात येते त्यासाठी प्रत्येकांने आपल्या मुलीला शिकविलेच पाहिजे. शुभविवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देवुन सामाजिक उपक्रम तसेच गावातील गोर गरीब मुला मुलींच्या शिक्षणांवर हा पैसा कामी आणावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गुर्मीत डडीयाल म्हणाले की, आपण समाजच काही तरी देणे लागतो या भावनेतून आर्थिक परिस्थिती हालाखीची परिस्थिती असलेल्या विद्यार्थिनींना आम्ही सर्व शैक्षणिक साहित्य तसेच वर्षभरासाठी दत्तक घेतले असल्याची माहिती डडीयाल यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें