प्रा. के. डी. वाघमारे यांच्या "वाळवंटातील रोपटं" चे प्रकाशन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 17 जनवरी 2019

प्रा. के. डी. वाघमारे यांच्या "वाळवंटातील रोपटं" चे प्रकाशन.


 सेलु(प्रतिनिधि) :येथील नुतन महाविद्यालयातील सेवा निवृत्त प्राध्यापक के. डी. वाघमारे यांनी लिहिलेल्या व निर्मल प्रकाशन नांदेड यांना प्रकाशित केलेल्या "वाळवंटातील रोपटं"या तीन अंकी नाटकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डाँ. जगदीश कदम यांच्या हस्ते बुधवार 16 रोजी विसावा हाँल नांदेड येथे करण्यात आले. यावेळी जेष्ठ लेखक डाँ. भगवान अंजनीकर, निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. के. डी. वाघमारे, देवदत्त माने यांची उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलतांना डाँ. कदम म्हणाले की, हे नाटक म्हणजे समाजातील वास्तवतेचे दर्शन घडविणारे असुन मानवीमनाचा ठाव घेणारे आहे. या नाटकाचे मुख्य पृष्ठ वाल्मिक सोनवणे यांनी डिझायीन केले असुन सुबक व सुवाच्य असे हे मुखपृष्ठ असल्याने सर्वानी कौतुक मान्यवरांनी केले. प्रा. वाघमारे यांचे साहित्य विविधांगी असुन त्यांचे चार कविता संग्रह, दोन नाटके, एक कथासंग्रह, एक संशोधित ग्रंथाचा समावेश असुन त्यांचे आत्मकथन लवकरच प्रकाशित होणार असुन त्यांच्या क्षितीजापलिकडे या नाटकास महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट राज्य वाड:मय पुरस्कार देखील मिळालेला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें