सेलू / प्रतिनिधी.
शहरातील विवेकानंद विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थिनिंनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
विद्यालयातील शिक्षक विजय चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की ,स्त्रीयांना चूल व मूल या परंपरेच्या बंधनातून बाहेर काढून शिक्षणाचा राजमार्ग दाखविला.स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.अनेक अडचणींना सामोरे जात आपले कार्य चालू ठेवले.
यावेळी विध्यार्थीनींनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद मंडलिक ,शंकर राऊत , चेतन नाईक , दीपाली भावसार , सतीश भुजबळ ,श्रीपाद जोशी ,संध्या शोभने सेवक महेश सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें