सेलू स्थानकावर जलदगती रेल्वेगाड्यांना थांबा देन्याच्या मागनीसाठी प्रवाशी संघटनेचे सचीवांच्या सौभाग़्वती प्रतीभा मेडाम यांना साकडे . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 3 जनवरी 2019

सेलू स्थानकावर जलदगती रेल्वेगाड्यांना थांबा देन्याच्या मागनीसाठी प्रवाशी संघटनेचे सचीवांच्या सौभाग़्वती प्रतीभा मेडाम यांना साकडे .


सेलू प्रतिनिधी


(सेलू) सेलू रेल्वे स्थानकावर नगरसोल -  नरसापुर, सचखंड एक्सप्रेस, रामेश्वरम ओखा एक्सप्रेस या जलदगती गाड्यांना थांबा द्यावा या साठी मराठवाडा रेल्वे प्रवाशी संघटनेने केंद्रीय रेल्वेमंञी ना.पियुश गोयल यांचे सचिव प्रवीण गेडाम याच्या पत्नी सौ. प्रतीभा गेडाम यांना निवेदन देवुन साकडे घातले. बुधवार दि.02 जानेवारी रोजी सायंकाळी सेलू येथे श्री प्रवीणजी गेडाम ( रेल्वे मंत्री श्री पियुष गोयल यांचे सचिव ) यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभाताई प्रवीणजी गेडाम ह्या आपल्या माहेरी श्री बोराडे यांच्या कडे आल्या आसता मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या सर्व सदस्यांकडून ताईंची भेट घेऊन त्यांचे कडे सेलू रेल्वे स्टेशन वरील सुविधा तसेच जलदगतीच्या रेल्वेच्या थांब्या साठीचे गेडाम साहेबांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी सौ. प्रतिभाताईंनी मी या बाबतीत साहेबांना स्वतः बोलून लक्ष घालायला लावते असे त्यांनी आश्वासन दिले . लोक सहभागातून तयार केलेले बेंचचे फोटो पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच ते फोटो स्वतः कडे शेअर करत साहेबांना दाखवेन असे देखील म्हणाल्या. या वेळी प्रवाशी संघटनेचे शिवनारायण मालाणी, शिवसेना शहर प्रमुख मनिष कदम, मोहन खापरखुंटीकर, ईश्वर जैन, शेख मुनीर आनंद बाहेती, प्रवीण मानकेश्वर, बबलू मंडलीक, विकी कुंदनानी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. शेवटी सौ प्रतिभाताई म्हणाल्या की सेलू ची प्रगती म्हणजे आपल्या सर्वांची प्रगती आहे, मी देखील सेलूचीच आहे त्यामुळे माझ्या माहेरच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.या प्रसंगी भास्कराव बोराडे, वामनराव बोराडे, राजेभाऊ बोराडे, रमेश बोराडे, सचीन बोराडे यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें