सह्याद्री ऑप्टिकल चे नावाखाली बोगस डॉक्टरचा सुळसुळाट.कार्यवाही करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 जनवरी 2019

सह्याद्री ऑप्टिकल चे नावाखाली बोगस डॉक्टरचा सुळसुळाट.कार्यवाही करण्याची मागणी.




सेलू प्रतिनिधी

सेलू येथील मोंढा भागात असलेल्या सह्याद्री ऑप्टिकल्स कडून नागरिकांची फसवणूक केल्या जात असून लूट केली जात आहे तरी त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय प्रशासनाकडे दिलीप डासाळकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सेलू येथील मोंढा भागात गेल्या काही वर्षापासून सह्याद्री ऑप्टिकल्स नावाचे चष्म्याचे दुकान असून  सदरील दुकान हे सरकटे यांच्या नावे असून ते स्वतः या दुकानावर कधीच बसून नसतात पाथरी येथील राज ऑप्टिकल्स या चष्म्याच्या दुकाना वर बसून ते दोन्ही दुकान चा कारभार पाहतात.  सेलू येथील दुकान जे चालवतात त्यांचे नाव रामेश्वर वानखेडे असून चष्म्याचा नंबर काढणे तसेच डोळ्यात टाकण्याकरिता पेशंटला डोळ्याचा ड्रॉप लिहून देणे आदी गोष्टी सर्रासपणे केल्या जातात त्यामुळे डोळ्याचा नंबर काढणे औषधी म्हणून डोळ्याचा ड्रॉप लिहून देणे ही कामे डॉक्टरांची असताना डॉक्टरची कुठलीही डिग्री अथवा डिप्लोमा नसताना  सरसपणे या गोष्टी केल्या जात आहेत मात्र गरजू व गरीब नागरिकांना यापासून डोळ्याला धोका अथवा इजा झाल्यास  त्यांच्या दृष्टीला काही अडचण आल्यास याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होतो वैद्यकीय प्रशासनाला तसेच जिल्हाधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात डासाळकर यांनी  म्हटले आहे की या बोगस डॉक्टर वर तात्काळ कार्यवाही  करण्यात यावी  ज्यामुळे नागरिकांच्या नजरेला इजा होणार नाही अथवा त्यांची नजर जाणार नाही याची काळजी घेऊन संबंधित प्रशासनाने वेळीच कार्यवाही करावी अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी केली आहे
सदरील दुकानाबाबत व नंबर काढणे व ड्रॉप लिहून देणे याबाबत यापूर्वीही अनेक जणांनी तक्रारी केलेले आहेत मात्र सरकटे व रामेश्वर वानखेडे यांनी पैशाच्या जोरावर त्या दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संबंधितावर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें