उत्कृष्ट वाचक पुरस्काराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी चे चार विद्यार्थी सन्मानित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 27 जनवरी 2019

उत्कृष्ट वाचक पुरस्काराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी चे चार विद्यार्थी सन्मानित.

"सलग तिसऱ्यांदा हा बहुमान मिळवत आहेत चिमुकले"

प्रतिनिधी.दि.26/01/2019.
राजमाता जिजाऊ फाउंडेशन मगरवाडी, तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड यांच्यावतीने अनेक शाळांमधून उत्कृष्ट वाचक पुरस्कारांची निवड केली जाते. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी चे विद्यार्थी या अभिनव उपक्रमांमध्ये सहभागी होतात. दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट वाचक पुरस्कारास पात्र ठरत आहेत .यावर्षीही कुमारी अनुराधा दिगंबर शेळके, शिवानी शिवाजीराव लंघे , तन्मय युवराज माने व अर्चना राजेभाऊ राठोड या चार विद्यार्थ्यांची उत्कृष्ट वाचक पुरस्कार म्हणून निवड करण्यात आली. व त्यांचा काल प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी राजमाता जिजाऊ फाउंडेशन च्या सचिव पुनम हजारे यांनी उत्कृष्ट वाचक पुरस्कार संदर्भात सांगितले, “ विद्यार्थ्यांच्या वाचनात वाढ व्हावी. वाचन हा विद्यार्थ्यांचा दागिना आहे. वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तुंग अशी भरारी घेतो. वाचनाच्या माध्यमातूनच विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिक्षणात मोठी क्रांती करू शकतो. आज विद्यार्थी पुस्तकात न रमता मोबाईल टीव्ही अशा माध्यमात अडकला आहे. यातून विद्यार्थ्यांनी बाहेर यावं व पुस्तकात रमाव , त्याने पुस्तक संग्रहित करावे. व उद्याचे उत्तम नागरिक घडावेत हाच या पुरस्कारा मागचा उद्देश आहे”. पुढे त्या बोलताना म्हणाल्या, गेल्या तीन वर्षापासून आपल्या शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात व आमचा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त करतात. ही तुमच्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी मनापासून या शाळेतील सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करते.

    याप्रसंगी  गावच्या सरपंचअश्विनीताई राठोड, गावचे पोलीस पाटील साहेबराव राठोड,  सामाजिक कार्यकर्ते माऊली राठोड, शाळेचे मुख्याध्यापक राम मैफळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आडे, ग्रामसेवक गोसावी साहेब, उपसरपंच बायनाबाई राठोड, ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई लंघे, राजेभाऊ राठोड, शिवाजीराव लंघे, साहेबराव लंघे, मधुकर आढे , सुनील आडे, तुकाराम राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवराज माने यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें