सेलू प्रतिनिधी.
सेलू शहरातील गणपती गल्ली मधील एका राहत्या घरात मोबाईलवरुन क्रिकेटवर सट्टा खेळताना दोन तरुणांना पकडण्यात आल्याची घट्ना गुरूवारी ता. २४ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या समारास घडली. या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या
माहितीनुसार परभणी येथील स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शहरातील गणपती गल्ली येथे
एका घरात बिगबश क्रिकेट लिगवर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून स्थानिक
गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी क्रिकेटवर लॅपटॉप व मोबाईलवरुन सट्टा खेळणाऱ्या विनोद उत्तमराव काळबांडे वय (२९) राहणार गणपती गल्ली, सेलू व संतोष किशनराव आरबाड वय (२२) राहणार बरसाले डिग्रस या दोन तरुणास पकडले असून त्यांचे कडून नगदी १ लाख ५४ हजार ६०० रूपये व ९९ हजार ५०० रूपयांचे जुगाराचे साहित्य असा एकुण २ लाख ५४ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेवरुन सेलू शहरात एकच खळबळ उडाली असून सदर घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली. या पुर्वीही क्रिकेटवरऑनलाईन
सट्टा खेळणाऱ्यांच्या घटना घडल्या आहेत.मात्र कठोर कारवाई होत नसल्याने पुन्हा सट्टा जोमाने सुरू राहतो. दरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद
दिल्यावरून आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे दरम्यान ऑनलाईन
सट्टा प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरु असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीपान शेळके हे करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें