'आनंदाचं झाड' हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 27 जनवरी 2019

'आनंदाचं झाड' हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन.

“माझ्या विद्यार्थ्यांच्या हातात आता ऊसतोडीचा कोयता न येता, इतिहास घडवणारी लेखणी आली आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे.” - माउली राठोड, सामाजिक कार्यकर्ते पार्डी.

प्रतिनिधी.दि.26/01/2019.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, 'आनंदाचं झाड' या मुलांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी  गावच्या प्रथम नागरिक सौ अश्विनी ताई राठोड, गावचे पोलीस पाटील साहेबराव राठोड, ग्रामसेवक गोसामी, मुख्याध्यापक राम मैफळ,उपसरपंच बायनाबाई राठोड, सामाजिक कार्यकर्ते माऊली राठोड, शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आडे, शाळेची मुख्यमंत्री अनुराधा शेळके, काजल राठोड, मुलींची प्रतिनिधी मनीषा राठोड, मार्गदर्शक शिक्षक युवराज माने, श्याम रुपनर ,विठ्ठल शेळके ,मंगेश नरसिंगकर ,संजय काकडे सुभाष लंगे आधी उपस्थित होते.
“मुलांच्या व्यक्तिमत्वास धुमारे फुटावेत, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेत वाढ व्हावी ,त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन करून लिहितं केलं. व त्यांच्या चिमुकल्या हातांनी त्यांच्या डोक्यातील कल्पना कागदावर उतरवले. व त्यातूनच 'आनंदाच झाड' हे हस्तलिखित तयार झालं.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते माऊली राठोड, म्हणाले “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची प्रचिती आम्हा सर्वांनाच आहे. परंतु आज माझ्या गावातील तांड्यावरील मुलांनी या कागदावर उतरवलेल्या विविध कथा कविता चित्र पाहता मी भारावून गेलो. ज्या मुलांच्या वडिलांच्या हातात कोयता आलेला आहे. हे त्यांचं दुर्भाग्य परंतु आज त्यांचीच मुलं लेखणीच्या माध्यमातून उद्याची मोठ मोठे स्वप्न कागदावर उतरत आहेत. याबद्दल मी शाळेतील सर्व शिक्षकांची मनापासून अभिनंदन करतो. व तुमच्या उपक्रमास शुभेच्छा देतो”. याप्रसंगी युवराज माने यांनी  राबविल्या जाणाऱ्या "आनंदाच झाड" या संकल्पनेची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली.
विमोचन प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत ची सर्व सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवराज माने यांनी केले तर आभार संजय काकडे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें