"वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी" - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 जनवरी 2019

"वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी"


वालुर प्रतिनिधी/
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आर.बि.राठोड, डि.आर.नाईकनवरे, बि.व्हि.बुधवंत, जी.एम.कावळे, उमाकांत क्षीरसागर आदिंची उपस्थितीत होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचारीञावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.या प्रसंगी आर.बि.राठोड, डि.आर.नाईकनवरे,बि.व्हि.बुधवंत, एम.एस.गिरी आदिंनी राष्ट्रमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जिवनचारीत्रँवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक एस.डी.भोकरे यांच्या आध्यक्षीय भाषणानाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.एन.बोंडे यांनी केले तर आभार जि.एम.कावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  कैलास राऊत, बळिराम शेंबडे,उमाकांत क्षीरसागर आदिंनी परीश्रम घेतले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें