नव्याने नियुक्त झालेले शिक्षक पोटे यांनी अर्वाच्च शब्द वापरल्याच्या कारणावरून ते शिक्षक आम्हास नको. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 जनवरी 2019

नव्याने नियुक्त झालेले शिक्षक पोटे यांनी अर्वाच्च शब्द वापरल्याच्या कारणावरून ते शिक्षक आम्हास नको.

नव्याने नियुक्त झालेले शिक्षक पोटे यांनी अर्वाच्च शब्द वापरल्याच्या कारणावरून ते शिक्षक आम्हास नको यासाठी कोपरगाव शहरातील प्रिसिद्ध एस, एस, जी,एम,कॉलेज च्या बी बी ए विभागातील विद्यार्थी व विद्यार्थींच्या वतीने प्राचार्य निकम यांना निवेदन देण्यात आला.



शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.


निवेदनात म्हटले आहे की  बी बी ए विभागातील नवीन प्राध्यापक तुषार पोटे यांनी दिनांक 8/ 1/ 2019 रोजी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलून त्यांचे परिचय करून घेत असतांना गैरशब्द व शिवीगाळ भाषेचा वापर केला आहे,
परिचय करून घेत असतांना पोटे म्हटले की विद्यार्थयांची हजेरी अनिवार्य आहे,तसेच तुमच्या बापाचा म्हणजे खरे बापाचा फोन नंबर दया, तुमच्या बापाशी बोलतो,माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,माझे फेसबुक अकाउंट चेक करा तुम्हाला कळेेल मी कोण आहे ,माझे किती फॉलोवर्स आहे ,तुम्ही जास्त नाटक करू नका नाहीतर तुमचे इंटर्नल मार्क्स माझ्या हातात आहे,मी कॉलेज लाईफ मध्ये खूप कुटाने केले आहे ,मुलींना मॅडम असा शब्द प्रयोग करून मिश्किल पद्धतींने बोलून व हसणे,,,
सदर वयक्तीची नेमणूक कार्यालयीन अधीक्षक श्री गोसावी एस एस यांनी आम्हाला त्रास देण्यासाठीच केल्याचे आरोप ही या निवेदना दवारे करण्यात आले आहे,
 शेवटी या निवेदनात म्हटले आहे कि तुषार पोटे यांची बदली दोन दिवसात करण्यात यावी,जर पोटे यांची बदली दोन दिवसात झाली नाही तर आम्ही सर्व बी बी ए चे विद्यार्थी आमच्या पालकांसोबत येऊन कॉलेज मधून आमचे दाखले परत घेऊ, व सदर शिक्षिका विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा ही इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें