आवलगाव येथे घरफोडी करून 69 हजाराचा माल लंपास. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 जनवरी 2019

आवलगाव येथे घरफोडी करून 69 हजाराचा माल लंपास.

सोनपेठः तालुक्यातील आवलगाव येथील सरस्वती मरळ यांच्या घरात कोणीही नसताना घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी घरातील एकुण 69000(एकुणसत्तर हजार) रूपयाचा माल लंपास केल्याची घटना सोमवार दिनांक 28 जानेवारी रोजी उघडकीस आली.


आवलगाव येथील सरस्वती मरळ या 26 जानेवारी रोजी गंगाखेड येथील आपल्या मुलाकडे भेटण्यासाठी गेल्या होत्या.


   सोमवार 28 जानेवारी रोजी शेजारच्यांनी फिर्यादी सरस्वती मरळ यांना फोनद्वारे घराचे कुलूप तोडुन चोरी झाल्याचे सांगितले यावरून फिर्यादी आवलगाव येथील घरी आले असता, घरातील दोन्ही कपाटातील 60000 (साठ हजार)रुपये रोख व नऊ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने असा एकुण एकोणसंत्तर हजार रूपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला म्हणुन सोनपेठ पोलिस ठाण्यात सरस्वती मरळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें