सोनपेठ राष्ट्रीय बंजारा परिषदेचे स्वाती राठोड आत्महात्या प्रकरणी तहसिलदार यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 जनवरी 2019

सोनपेठ राष्ट्रीय बंजारा परिषदेचे स्वाती राठोड आत्महात्या प्रकरणी तहसिलदार यांना निवेदन.

  सोनपेठ मंजूर मूल्ला/ बिडजिल्ह्यातील तेलगाव येथे शिक्षण घेणारी स्वाती राठोड आत्महात्या प्रकरणातील दोषी असलेल्या आरोपीना अटक करून कडक कार्यवाही करण्याची मागणी सोनपेठ राष्ट्रीय बंजारा परिषदेने तहसिलदार यांना  निवेदना द्वारे केली.                              .                                                             .                                                                निवेदनात सांगितले तेलगाव येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थीनी स्वाती राठोड रा.(ब्राह्म्णाथ तांडा) याची शाळेतीलच विद्यार्थी अमोल तिडके व हनुमान सांवत हे वारंवार छेड काढत असल्याची तक्रार तिने शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या कडे केली होती पण केलेल्या तक्रारीतुन कसल्याच प्रकारची या दोघां विद्यार्थीयास तंबी न दिल्यामुळे त्यांचे मनोबल वाढत गेले व ते रोजच शाळेत स्वाती राठोड याची छेड करू लागले या दोघांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून या विद्यार्थीनीने आपल्या रहात्या घरी विष प्राशन केले असता त्यास बिड येथील रूग्णालयत दाखल करण्यात आले होते तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाले.स्वाती राठोड या विद्यार्थीनीला आत्महात्यास भाग पाडणा-या दोन्ही आरोपी ना तत्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याची मागणी सोनपेठ राष्ट्रीय बंजारा परिषदेचे वतिने सोनपेठ तहसिलदार जिवराज डापकर यांना निवेदन देवून केली. निवेदनात भारत चव्हाण,विनायक जाधव,अविनाश राठोड,संतोष राठोड,मगेश पवार,रमेश जाधव,अमोल चव्हाण,अर्जून जाधव,पंडीत चव्हाण यांच्या सह अदीचे स्वाक्ष-या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें