सेलू प्रतिनिधी.
सेलू (12) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०१८ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात अपूर्वा पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थ्यांने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
यात सिव्हिल इंजिनीरिंग विभागातील विद्यार्थिनी ऋतुजा आवटे हिने ८४% गुण,इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातील शीतल पवार हिने ८२% गुण,तर विशाल लाड या विद्यार्थ्यांने ८२% गुण मिळवून महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
याच बरोबर किरण घोगरे ७९%, कुकडे प्रतीक्षा ७९%,भागवत भाग्यश्री ७७.२८%, राठोड योगेश ७५%, ताठे प्रतीक्षा ७६%, अन्सारी गुफरान ७४%, आकाश येळापूरे ७३%, भोंगाने अमर ७२% गुण मिळऊन विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा एकूण निकाल ७५%,व्दितीय वर्षाचा ८०% टक्के तर तृतीय वर्षाचा ९०% टक्के एवढा लागला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजयजी रोडगे साहेब,संस्थेच्या सचिव मा.डॉ.सौ.सविताताई रोडगे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, श्री. राजेश घनसावंत, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, सर्व विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें