साईबाबा महाविद्यालयात जिजाऊ आणि विवेकानंदांना अभिवादन . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 जनवरी 2019

साईबाबा महाविद्यालयात जिजाऊ आणि विवेकानंदांना अभिवादन .

शिर्डी,प्रतिनिधी ,राजेंद्र दुनबळे
श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल,उपजिल्हाधिकारी मनोज घोडे पाटील,बाबासाहेब घोरपडे,दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले.प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अधिक्षक राजेंद्र कोते,प्रा.अमोल कचरे ,प्रा शिवाजी ढोकणे,डॉ आशिष धोकटे,डॉ सुनिता वडीतके,प्रा. किशोर शेळके,प्रा.प्रणाली पवार, प्रा.स्वप्नाली खांडरे,डॉ योगिता गायकवाड,डॉ गणेश भांड,प्रा दिपाली उपासनी, प्रा सचिन सालपुरे, प्रा शारदा धनवटे, प्रा प्रसाद कोते, प्रा प्रशांत गडकरी, प्रा वंदना देशमुख, प्रा दिपक चोळके, ग्रंथपाल भाऊसाहेब शिंदे,दिनेश कानडे,मनोज बकरे,प्रशांत शेळके, रामनाथ कासार आणि महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्राचार्य शिवगजे म्हणाले की,जिजाऊ म्हणजे आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.शिक्षणा संदर्भातील विवेकानंद यांचे म्हणणे शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.
   प्रा.शितल धरम,प्रा.दिपक पटारे,प्रा सुनिल कांडेकर आणि विद्यार्थी ऋषिकेश आबक,भारत दणके, विराज जाधव,लक्ष्मी गोल्हार, श्रद्धा तुरकणे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रांगोळी आणि मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.प्रा.सोनाली हरदास व प्रा सरीता लावरे यांनी प्रास्ताविक केले.सिद्धी दळवी व प्रा.कांचन चौधरी यांनी आभार मानले.गायत्री ठाकरे आणि ऋतुजा भोकरे यांनी सूत्रसंचालन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें