तहसीलदार शेवाळे यांना रुजू करू नये.सेलू तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 जनवरी 2019

तहसीलदार शेवाळे यांना रुजू करू नये.सेलू तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.





सेलू प्रतिनिधी

सेलू तहसीलदार बालाजी शेवाळे यांची 8 जानेवारी रोजी सेलू तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी भाग्यश्री देशमुख या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आहेत बालाजी शेवाळे यांची पाथरी मानवत या तालुक्यातील कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे त्यांना सेलू तहसीलदार म्हणून रुजू करून घेऊ नये अशी मागणी सेलू तालुका (गट क) महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन द्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे बालाजी शेवाळे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने त्यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केलेले आहे शेवाळे यांनी अद्यापर्यंत या कार्यालयामध्ये कामकाज केले आहे तेथील अधिकारी कर्मचारी मानसिक दडपणाखाली असल्याच्या पूर्वअनुभव आहे या बाबी विचारात घेता त्यांना सेलू तहसीलदारपदी रुजू करून घेऊ नये अन्यथा सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल तसेच कार्यरत असलेल्या तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांना पदावर कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर त्र्यंबक बहुरे के एन देशमुख के पी काळे बी एस बन पी व्ही डाके जे बी चव्हाण पी ए तावडे पी एस मुक्तेश्वर ए डी लोखंडे ए आर खडके ओ ई काळे डी आर देशमुख शेख जहिरोद्दीन  के एच चाऊस ई जी भिसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें