सुशिलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा सेलूत निषेध (मारवाडी समाजाचे तहसीलदारांना निवेदन ). - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 जनवरी 2019

सुशिलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा सेलूत निषेध (मारवाडी समाजाचे तहसीलदारांना निवेदन ).


(सेलू) कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मारवाडी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा तहसीलदार देशमुख यांना निवेदन देवुन जाहीर निषेध करण्यात आला.
       निवेदनात  म्हटले आहे की, माजी केंद्रीय गृहमंञी सुशिलकुमार शिंदे यांनी नागपुर येथील कार्यक्रमात मारवाडी समाजाच्या भावना दुखवनारे बेताल वक्तव्य केले आहे, मारवाडी समाज हा देशातच नव्हे तर विदेशातही तेथील समाजाशी एकरूप होऊन तेथील विकासासाठी सदैव विधायक कार्यात अग्रेसर आहे. हा समाज स्वतः परीश्रम करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देतो, तसेच या समाजाने ईतर कोणत्याही समाजात कधीही तेढ निर्माण केली नाही, अशा पुरोगामी विचाराच्या मारवाडी समाजाबद्दल देशातील व राज्यातील मोठमोठी वैधानिक पदे भुषविलेल्या व्यक्तिच्या संकुचीतमनोवृत्तीचा सेलू तालुका सकल राजस्थानी समाज बांधवांनी येथील मोंढा भागातील मारोती मंदिरापासुन सेलू तहसील कार्यालया पर्यंत  काळ्याफीती लावुन  मोटारसायकल रँली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निषेध रँलीत मारवाडी समाजातील सर्व जाती, पोटजातीचे समाज बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें