सेलू प्रतिनिधी.
सेलू, येथिल न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित (दि.25) करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन नगर सेविका उषाताई दौड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय भागवत यांनी केले. मुख्याध्यापक पगार बी एम, पर्यवेक्षिका निता काळम, रमेश दौड, दिनकर नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती. रोहिनी भदर्गेच्या 'तू शुध्दि दे, तू बुध्दि दे' या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. किर्यक्रमाचे संचलन शेषराव नागरे यांनी केले.
आनंद गगरीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध खाद्य पदार्थांचे 17 स्टाँल विद्यार्थ्यांनी लावले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात 27 विद्यार्थ्यांनी कलाप्रकार सादर केले त्यात वैयक्तिक व समूह नृत्य, गीत गायनात भारूड, देशभक्तिपर गिते सादर केली. शेलापागोटेचा आनंद मुलांनी घेतला. संतोष कुलकर्णी, भागवत, शरद मगर, मंगल जोगदंड, तेलगोटे मँडम, तुकाराम पूटवाड,सचिन खरात यांनी शेलापागोटेंचे वाचन केले. राष्ट्रिय मतदार दिनानिमित्त धनंजय भागवत यांनी शपथेचे वाचन केले व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
कार्यक्रमाचे आभार गणेश गुध्दे यांनी मानले. कार्यक्रमास पालक मोठ्यासंखेने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें