सेलू प्रतिनिधी.
सेलु येथिल अब्दुल कलाम उर्दू शाळेत आज आनंदनगरी आयोजित करण्यात आली होती त्यामधे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अपापली विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावली होती आणि यावेळी खुप मोठ्या प्रमाणावर पालक आणि इतर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. या आनंदनगरी मधे सहभागी विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री चा खुप चांगला अनुभव घेतला आणि बऱ्याच प्रमाणात मुनाफा कमावल्याचा आनंद मिळवला.
या कार्यक्रमनिमित्त शाळेतील सहशिक्षक पठाण रहेमान, मोहम्मद अतिख, सय्यद करामत, अंसारी शारिक आणि पत्रकार अबरार बेग यांनी उपस्थिति दर्शवुन मुलांचा उत्साह वाढवला.या आनंद नगरी ला खान अब्दुल गफ्फार खान या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील भेट देऊन खरेदी चा आंनद घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें