मुलांनो व्यसनापासून दूर रहा.... दत्तराव पावडे .राष्ट्रीय सेवा योजना चे पावडे हातगाव येथे उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 जनवरी 2019

मुलांनो व्यसनापासून दूर रहा.... दत्तराव पावडे .राष्ट्रीय सेवा योजना चे पावडे हातगाव येथे उदघाटन.


सेलू प्रतिनिधी


सेलू तालुक्यातील पावडे हादगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तराव पावडे यांच्या हस्ते करण्यात आले..
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र शिंदे हे होते
यावेळी श्री पावडे म्हणाले की,
मी प्रथम एक माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची आपल्या राष्ट्राची सेवा केली पाहिजे अशा प्रकारची ईश्वरसेवा म्हणजेच जनसेवा आहे, जनसेवा म्हणून तरुण आणि निर्व्यसनी राहून शरीर आपली बुद्धिमत्ता योग्य कार्यास वापरली तर खऱ्या अर्थाने तरुण राष्ट्राची निर्मिती करतील आणि उद्याचा भारत हा याच पीढी मधून घडणार आहे उद्याचा भारत म्हणजे हे तरुण आहेत...

शिबिर दिनांक 29 जानेवारी ते   1 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे शिबिराच्या माध्यमातून गावाची स्वच्छता पर्यावरण व निसर्गाचे संवर्धन व निसर्गाचे संवर्धन करण्यात येणार असून तसेच
महाविद्यालयातील मुलावरती श्रमाचे संस्कार होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा ,कृतीशीलता व क्रियाशिलता निर्माण होईल या या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी रमेश बैनवाड. डॉ,सवांडकर,
संजय पिंपळगावकर, हेमंत हटसनकर. सरपंच अनंत पावडे, गावात ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थितीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें