सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या? सासरच्यांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप - - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 जनवरी 2019

सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या? सासरच्यांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप -



शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.


कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा मृतदेह आज सकाळी विहिरीत मयत अवस्थेत आढळल्याने सदर विवाहितेला सासरच्या लोकांनीं मारल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती पठारे वय 22 हिचा विवाह 30 एप्रिल 2018 रोजी कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील रहिवासी शामहरी त्रिभुवन याच्याशी झाला. त्यानंतर आरती हिच्याकडे तिच्या सासरच्यांनी पैशाची मागणी केली होती. आरती हिच्या आईने उसने व वावर गहाण ठेऊन 50 हजार रुपये दिले होते व आत्ता परत 1 लाख रुपयांची मागणी केली होती. पण दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ते पैसे देऊ शकले नाही. त्यावरून आरती हिच्या सासरी वाद चालू होता. आज सकाळी आरती हिचा भाऊ संक्रांतीसाठी बहिणीला आणायला गेला पण तेथे गेल्यावर  आरती 2 दिवसांपासून घरी नसल्याचे समजले त्यांनी शोध घेतला असता आरतीचा मृतदेह विहिरीत आढळून आला असल्याची माहिती आरतीच्या नातेवाईकांनी दिली. यावेळी आरतीच्या नातेवाईकांनी  आरती हिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला. यावेळी आरतीच्या नातेवाईकांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांनी आरतीच्या सासू सासाऱ्यांना ताब्यात घेतले असून आरती हीचा पती पुण्याला गेला असल्याचे समजते.
    रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
आरती हिने आत्महत्या केली का तिचा घातपात झाला याबाबत पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें