शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
मकरसंक्रातीच्या सकाळी गॅसचे फुगे बनवून विकणाऱ्या एका व्यक्तीवर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव शहरातील एस जी विद्यालया जवळील चौकामध्ये गॅसचे फुगे बनवून विकणारा इसमा जवळील टाकीचा स्फोट झाल्याने तो जागीच ठार झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की फुगे विकणारा च्या शरीराच्या मासाचे तुकडे सैरावैरा पडले होते. या टाकीचा स्फोट झाल्यानंतर आवाज इतका भीषण होता की परिसराच्या नागरिकांना याचा हादरा बसला. हा फुगेवाला गांधीनगर येथील रहिवासी असून त्याचा नाव जुबेर रशीद पठाण असल्याचा समजतंय .दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल होइ पर्यंत परिसरातील नागरिकांनी फुका विक्रेत्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें