बेदखलांच्या दोन वेळच्या अन्नाची भ्रांत संपेना जीवाचा ठोका चुकवणारा दोरीवरचा खेळ थांबेना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 जनवरी 2019

बेदखलांच्या दोन वेळच्या अन्नाची भ्रांत संपेना जीवाचा ठोका चुकवणारा दोरीवरचा खेळ थांबेना.


 शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.


      तारीख १० जानेवारी२०१९ वार गुरूवार... सकाळी १० वाजेची वेळ...शाळेला जाण्याची लगबग... सावळीविहिर फाटा ओलांडत असतांना  समोर लोकांची गर्दी दिसली.सहज म्हणून माझ्यातला पत्रकार जागृत झाला. गाडी बाजुला लावून गर्दीत सामील झालो.बघतो तर काय ? जीवाचा ठोका चुकवणारा दोरीचा खेळ सुरू होता. साधारण बारा,तेरा वर्षाची चिमुरडी बालसुलभ जीवन त्यागून पोटाची खडगी भरण्यासाठी दोन बांबुना बांधलेल्या दोरीवर जीवाचा तोल सांभाळत कळसुत्रीसारखी हेलखावे खात होती.ढुंम-ढुंम-ढुंम आवाज सभोताली घुमत होता..बघ्यांची गर्दी कुतुहलाने डोळे विस्फारून उभी होती. मात्र त्यांच्या संवेदना बोथट दिसत होत्या. कोणताही माणूस सढळ हस्ते मदतीला येतांना दिसत नव्हता.. फक्त कौतुकाचे बाष्फळ फवारे सोडत होता.
   सर्वांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायदयाची ऐशी-तैसी होतांना उघडया डोळयांनी बघत होतो...जीव कालावून गेला. दोन वितीचं पोट भरण्यासाठी निराधार व बेदखल कुटुंबाची आधार होऊ पाहणारी चिमुरडीची जीवघेणी कसरत माझ्या संवेदनानां चटके देऊन गेली.. माझा उर दाटूनआला...डोळ्याच्या पापण्या पाणवल्या अन नकळत खिशात हात गेला..हातात आलेली शंभरची नोट त्या चिमुरडीच्या आईच्या हातात देतांना माझी मान मात्र खाली झाली. या बेदखल कुटुंबाचा समाज म्हणून मी स्वतः ला दोषी मानू लागलो.तेथे उभे राहणे असहय झाले. निमूटपणे माघारी फिरलो,आणि एक नवीनच दुष्य दिसले..मघाशी कौतुकाचे बाष्फळ फवारे उडविणा-या माणसांची माणुसकी जागृत झाली. आणि पैशांचा वर्षाव झाला.. त्यादिवसापुरते दु:ख आणि समाधान घेऊन शिर्डीत  पोहचलो सावित्रीबाई फुले  जयंतीनिमित्त आयोजित वत्कृत्व स्पर्धेत मुली खडया आवाजात सावित्रीमाईचे कार्य सांगत होत्या.त्यावेळी दोरीवर जीवाचा खेळ करणारी उपेक्षित सावित्रीची लेक डोळयासमोरून जात नव्हती. महीलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान व संसाराची राखरांगोळी केली. त्या सावित्रीमाईच्या लेकी शिक्षणापासून कोसो दुर आहेत याचे सल बोचत राहिले.

         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत देश प्रवेशीत होत असतांना उपेक्षीतांच्या अपेक्षांची पुर्ती न होणे हे समाज आणि शासनाच्या उदासिनचे प्रतीक म्हणावे कि बेदखल डोंबारीच्या प्राक्तानाचे भोग म्हणावेत या द्विस्थितीत मनाला विष्णता घेरत जाते. जेव्हा खेळण्या बागळण्याच्या वयात अन शिक्षणाच्या प्रवाहात ज्ञान कण गोळा करण्याच्या बालवयात दोरीवरची जीवघेणी कसरत करणारे चिमुरडे पाहिले कि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बेदखल परिवारांच्या दैन्यावस्थेचे दोषी कोण हा यक्षप्रश्न जीव पिळवटून टाकतो.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें