भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 जनवरी 2019

भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त.

मुंबई विशेष प्रतिनिधी.समशेर खान.
भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला होतो, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. धनंजय कुलकर्णी भाजपाचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत. अद्याप याबद्दल भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. डोंबिवलीतील महावीर नगरमध्ये धनंजय कुलकर्णी यांचं दुकान आहे. त्या दुकानात कल्याण गुन्हे शाखेला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. हा संपूर्ण शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला. यामध्ये अनेक विदेशी पिस्तुलांसह, चाकू, सुरे, तलवारी, कुऱ्हाडींचा समावेश आहे. कुलकर्णी यांनी इतका मोठा शस्त्रसाठा कुठून आणला, तो त्यांनी कशासाठी बाळगला होता, या शस्त्रांची विक्री केली जाणार होती का, या प्रश्नांचीउत्तरं मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. भाजपा शहर उपाध्यक्षाच्या दुकानात शस्त्रसाठा सापडल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबद्दल अद्याप भाजपाच्या एकाही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी कारवाई थांबवावी, यासाठी वरुन दबाव आणला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें