डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रिन्स अकडमी व क्युरीअस कीड्स प्री-स्कूलला भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 जनवरी 2019

डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रिन्स अकडमी व क्युरीअस कीड्स प्री-स्कूलला भेट.


सेलू प्रतिनिधी

सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकँडमी व सँनरो  एज्युकेअर प्रा.ली. प्रस्तुत क्युरीअस कीड्स प्री-स्कूलला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्य्क्ष नरेंद्र काळे यांनी (ता.२५) वार शुक्रवार रोजी शैक्षणिक संकुलानाला भेट दिली .
संस्थेच्यावतीने अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी नरेंद्र काळे यांचा सत्कार केला. यावेळी डॉ.अरविंद बोराडे,डाँ. प्रजीत रावते आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी प्रिन्स अकॅडमी व क्युरिअस किड्स प्रीस्कूल च्या सर्व डिजीटल वर्गांची, कौशल्य युक्त व नाविण्यपुर्ण शैक्षणिक पद्धतींची पाहणी केली. तसेच
डॉ, संजय रोडगे हे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील सर्वोत्तम सामावलेले शिक्षण सेलू सारख्या ग्रामीण ठिकाणी देत आहेत. कृतीयुक्त शिक्षणावर या स्कूल मध्ये भर देतात त्या मुले विध्यार्थ्यांना ती गोष्ट किवा तो अभ्यासक्रमातील भाग सहज आत्मसात होते. पुण्या मुंबईच्या धरतीवर आपण शिक्षणपद्धती या स्कूलमध्ये उपलब्ध करून दिली. नाविन्यपूर्ण गोष्टीचा समावेश अध्यापनात करण्यात येतो. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात संस्थेचे नाव आहे. अशीच शैक्षणिक प्रगती व्हावी. याबद्दल नरेंद्र काळे यांनी शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे , राजेश घनसावंत, क्युरीअस कीड्सच्या प्राचार्या मेरीना अवागशीनी, प्रिन्स अकडमीचे गल्यान्सी फर्नांडीस, डॉ.राम रोडगे बी. एड कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मधुबाला बोराडे, ज्ञानतीर्थ विध्यालायाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, आदित्य डी.एड कॉलेजच्या प्राचार्या मीनाक्षी रत्नपारखी, प्रिन्स आदिवासी प्रकल्प प्राचार्य विष्णू शिसोदे आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी तर आभार मेरीना अवागशीनी यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें