सेलू प्रतिनिधी
जिंतूर : दि.1 जानेवारी 2019 ताठापूर ता.जिंतूर येथे महावितरणच्या रोहित्रात बिघाड होऊन संपूर्ण गावात वीजप्रवाह उतरला होता.त्याचवेळी गावातील युवक रामदास वाकुडकर वय 30 वर्षे याचा घराच्या पत्राला हात लागून त्यास जोराचा शॉक लागून यातच त्याचे दुर्दैवी निधन झाले.रामदासच्या निधनाने घरचा कर्ता गेला व संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले.ही दुर्दैवी घटना राम नाना पाटिल (विधानसभा प्रमुख तथा जि.प. गटनेते शिवसेना परभणी) यांना समजताच त्यांनी मृताच्या कुटुंबियांस भेट देऊन सांत्वन केले व दहा हजार रु.आर्थिक मदत देऊन मदतीचा हात दिला.
याप्रसंगी गंगाधर मोरे (सर्कल प्रमुख भोगाव)अतुल डख, लखन माने तुळशीराम वाकुडकर पंडितराव वाकुडकर,रावसाहेब वाकुडकर,जगन्नाथ वाकुडकर, विठ्ठल वाकुडकर,पांडुरंग वाकुडकर,शिवाजीराव वाकुडकर आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें