सिल्लोड व अंभई येथील विविध मागण्यांसाठी एमआयएमचे आमरण उपोषण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 जनवरी 2019

सिल्लोड व अंभई येथील विविध मागण्यांसाठी एमआयएमचे आमरण उपोषण.


सिल्लोड :  प्रतिनिधी ( दि.२५ ) - सिल्लोड शहरातील मोहम्मद अली जोहर कॉलनी परिसरात रस्ते व नाली बांधकाम तातडीने करून सर्वे नंबर ८५ मध्ये बांधण्यात आलेली अनाधिकृत भिंत पाडण्यात यावी व शहराच्या इतर मागण्यांसाठी तर अंभई येथील नियमबाह्य घरकुलाची चौकशी व्हावी तसेच आरक्षित जागेवर निवडून आलेल्या व मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून फेर निवडणूक घ्यावी तसेच शासनाच्या मालकीच्या गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी आदी मागण्यांसाठी सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यलया समोर एमआयएमचे आमरण उपोषण सुरू

एमआयएमच्या वतीने सिल्लोड शहरासह अंभई येथील विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर (दि.२५) शुक्रवार रोजी पक्षाचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसलेले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या व समस्या या प्रमाणे आहेत.
सिल्लोड शहरातील मौलाना मोहमहद अली जोहर व जमालशाह कॉलनीतील रस्ते संदपस सांडपाण्याच्या नाल्यांचे काम करावे तसेच परिसरात शादीखाना निर्माण करावा व सर्व्हे नंबर ८५ मध्ये बांधण्यात आलेली अनधिकृतपणे भीत पाडावी तर अंभई येथील ग्रामपंचायतीने मनमानीपणे बनावटी कागदपत्रांच्या आधारे एकाला दिलेले घरमूल रद्द करावे व ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले ३० दुकान गाळे पाडण्यात यावे, दोषींवर कारवाई करावी तसेच महसुलाच्या डब्बर व मुरुमची रायल्टी न भरता अवैधरित्या झालेली गौण खनिज उत्खनन बाबतीत संबंधितांवर कारवाई करावी व शासनाने ठोठावलेला ३ लाख ६० हजाराचा दंड तात्काळ वसूल करण्यात यावा. वरील मागण्यांसह इतर मागण्यांसाठी उप विभागीय अधिकारी सिल्लोड कार्यालयासमोर एमआयएमच्या वतीने शहरातील शेख मुख्तार, फहिम पठाण व अंभई येथील अशोक सोनवणे, सज्जाद देशमुख व गणेश दळवी आदी पदाधिकारी आमरण उपोषणसाठी बसलेले आहेत.प्रशासनाच्या वतींने उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवड व तहसिलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार एन के मोरे, किरण कुलकर्णी व अय्याखान पठाण, अव्वल कारकून विजय चव्हाण व  अनिल देशमुख यांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचू विनंती करीत समेट घडविण्याचे प्रयत्न केले परंतु सायंकाळ पर्यन्त कुठलाच तोडगा निघाला नसल्याने आमरण उपोषण सुरूच होते. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें