पाथरी तहसील समोर बळीराजाचे उपोषण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

पाथरी तहसील समोर बळीराजाचे उपोषण.



प्रतिनिधी/पाथरी नदीम तांबोळी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही शेतकऱ्या प्रति प्रशासनाचे उदासीनता जुलमी व अन्यायकारक धोरण सुरुच आहे .दिं.08/01/2019.मरडसगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसिल कार्यालय पाथरी  तहसिलदार साहेबांना मरडसगाव साठी  दत्तक  बँक  बदलून देण्याबाबत आता पर्यंत 5 निवेदन देण्यात आले.मरडसगाव  तालुका पाथरी  या गावाला दत्तक बँक सेलू येथील एच. डी. एफ.सी बँक सेलू  शाखा दत्तक आहे .त्यामुळे त्याना सेलू हे दळणवळणासाठी अंतर लांब असल्याने तसेच ती बँक खाजगी असल्याने केंदीय व राज्य सरकार चे कोणत्याही योजने चे लाभ मिळत नाही म्हणून आम्ही आतापर्यंत 5 निवेदन देऊन ही प्रशासनाणे
तरीसुद्धा यांवर काही हि निर्णय घेतला नाही...
त्यामुळे आता हे निवेदन शेवटचे असेल असे मरडसगाव येथील शेतकऱ्याने सांगितले आहे  ०८/०१/२०१९ रोजी तहसिल कार्यालय पाथरी समोर आमरण उपोषणाला बसले आहे आमच्या मागणी पूर्ण न केल्यास आम्ही सामूहिक आत्मदाहन चा ईशारा निवेदनात शेतकऱ्यांना दिला आहे
या उपोषणा दरम्यान काही घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार बँक प्रशासन व तहसिल प्रशासन राहिल.
समस्त शेतकरी गावकरी मंडळी मरडसगाव यांच्या वतीने हे निवेदन दिले आहे.आणि शेतकरी आज पासून उपोषणाला बसले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें