सोनपेठ (प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्राचे जनक तथा दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी दर्पन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी सोनपेठ तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.
शहरातील माजी मुख्यमंञी कै. शंकरराव चव्हाण व्यापार संकुल येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शेतकरी संघटनेचे मराठवाडा नेते सुधिर बिंदू हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्याध्यक्ष शिवमल्हार वाघे यांनी केले.
या वेळी बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सुधिर बिंदू, साजेद खुरेशा, पञकार मल्लिकार्जुन सौंदळे, भागवत पोपडे यांनी मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी राध्येशाम वर्मा, मंजूर मुल्ला, सिद्देश्वर गिरी, मल्लीकार्जू, किरण स्वामी, रामेश्वर पोटे , गजानन चिकणे, शिवाजी कुंभारीकर देवानंद सौंदळे, व्यापारी महासंघाचे अशोक आंभुरे,शेख सलमान,यांची उपस्थिती होती
सोनपेठ तालुक्यातील रस्ते, पाणीटंचाई, विज, शाळा , शिर्शी पुल, बस स्थानक, आरोग्य सुविधा आदी मुलभुत सोयसूविधा व वाढत्या समस्यांना आळा घालण्यासाठी सर्वांनी आपल्या वृत्तपञातून पाठपुरावा करण्याचे आवाहन बाबासाहेब गर्जे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन पञकार राजेश खेडकर यांनी मानले यावेळी जनसेवा मित्र मंडळाच्या वतिने सर्व पत्रकार बांधवाचे पुष्प गुच्छ देवून आभिनंदन करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें