सेलू येथे शिक्षकांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 5 जनवरी 2019

सेलू येथे शिक्षकांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा.


 सेलू प्रतिनिधी.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा,  हेलसच्या वतीने  शिक्षकांसाठी मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा मंगळवारी दि. ८ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सेलू जि.परभणी येथे होत आहे.
दि.२८ डिसेंबरला झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १२६ स्पर्धक शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हांसह सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्राने सन्मानीत करण्यात आले. प्रथम क्रमांकप्राप्त स्पर्धक विभागीय स्पर्धेत सहभागी होत आहेत.
यात नामदेव निकम ( औरंगाबाद ) , ज्ञानेश्वर झगरे ( जालना ), तुकाराम डोंगरे ( बीड ), धाराशिव शिराळे ( नांदेड ) , शिवदास पोटे ( हिंगोली ) , मीना होनराव ( लातूर ), भगवान पावडे ( परभणी ) हे स्पर्धक सहभागी होत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी, प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध वक्त्या प्राचार्या डॉ कमलताई ठकार ( लातूर ) व प्रसिद्ध पटकथाकार प्रा.चंद्रकांत शिंदे ( मुंबई ) उपस्थित राहणार आहेत. विजेत्यांना सन्मानचिन्हांसह रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्राने गौरविण्यात येणार आहे. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या अॅड.वसंतराव खारकर सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित या स्पर्धस उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक कल्पना हेलसकर, डॉ सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, योगेश ढवारे, सर्जॆराव लहाने, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, विलास शिंदे, मंताजी ढाकरे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें