सोनपेठ तहसिलची २९ 'गाढवांवर' कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 19 जनवरी 2019

सोनपेठ तहसिलची २९ 'गाढवांवर' कारवाई.

सोनपेठ मंजूर मूल्ला/
सोनपेठ तालुक्यातील खडका- मोहळा दरम्यानच्या गोदावरी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या गाढवांवर धडक छापा टाकून तब्बल २९ गाढवे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांच्या आदेशानुसार सोनपेठ महसूल विभागाने अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गस्त घालत असतांना ता.१८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खडका - मोहळा दरम्यानच्या गोदावरी पात्रातून अनेक गाढवांद्वारे रेती उपसा चालू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून महसूल पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी त्याठिकाणी जाऊन थेट कारवाई करत अवैध रेती उपसा करणाऱ्या तब्बल २९ गाढवांना ताब्यात घेतले. तसेच ही अवैध रेती उपसा करणारे 'गाढव मालक' त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र संबधित रेतीने भरलेली गाढवे महसुलच्या पथकाने ताब्यात घेऊन खडका येथील पोलीस पाटलांच्या ताब्यात दिली आहेत. तसेच ती गाढवे खडका येथील वीज उपकेंद्राच्या परिसरात कोंडून ठेवण्यात आली असल्याची माहिती आवलगाव मंडळाचे मंडळ अधिकारी शिवाजी कराड यांनी दिली. या कारवाईत महसूल पथकातील शिवाजी कराड, तलाठी आर.टी. लटपटे, अनिल कदम, ज्ञानेश्वर चलपिलवार, परमानंद जमशेट्ये, शाहूराव दीक्षित तसेच पोलीस पाटील वैजनाथ यादव यांचा समावेश होता.
दरम्यान मोठ्या वाहनांवर कारवाई होत असल्यामुळे आता रेती तस्कर हे गाढवांचा वापर करत असल्याचे स्पस्ट झाले आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत असतांनाच रेती तस्कर हे वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असल्यामुळे महसूल विभागासमोर मोठे आव्हान उभे राहत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें