आमदार राजेश भैय्या टोपे यांची प्रिन्स अकॅडमी व क्युरीअस कीड्स प्री-स्कूल ला शैक्षणिक भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 4 जनवरी 2019

आमदार राजेश भैय्या टोपे यांची प्रिन्स अकॅडमी व क्युरीअस कीड्स प्री-स्कूल ला शैक्षणिक भेट.



 सेलू प्रतिनिधी.

            सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडमी व सनरो  एज्युकेअर प्रा.ली. प्रस्तुत क्युरीअस कीड्स प्री-स्कूल उच्च व तंत्र शिक्षण माजी मंत्री तथा आमदार राजेश भैय्या टोपे व  मत्स्योदरी संस्थेतील घटक संस्थेचे सर्व प्राचार्य यांनी  (ता.२) वार गुरुवार रोजी शैक्षणिक संकुलानाला शैक्षणिक भेट दिली .

संस्थेच्यावतीने अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी राजेशभैय्या टोपे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी प्रिन्स अकॅडमी व क्युरिअस किड्स प्रीस्कूल च्या सर्व डिजीटल वर्गांची, कौशल्य युक्त व नाविण्यपुर्ण शैक्षणिक पद्धतींची पाहणी केली. तसेच

डॉ, संजय रोडगे हे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील सर्वोत्तम सामावलेले शिक्षण सेलू सारख्या ग्रामीण ठिकाणी देत आहेत. कृतीयुक्त शिक्षणावर या स्कूल मध्ये देतात त्या मुले विध्यार्थ्यांना ती गोष्ट किवा तो अभ्यासक्रमातील भाग सहज आत्मसात होते असे गौरवउद्गार करून पुण्या मुंबईच्या धरतीवर आपण हे शिक्षणपद्धती या स्कूलमध्ये उपलब्ध करून दिली. अशीच शैक्षणिक प्रगती व्हावी. याबद्दल राजेशभैय्या टोपे यांनी शुभेच्या दिल्या. शैक्षणिक भेटीमध्ये जालना मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय आधिकरी डॉ.बी आर. गायकवाड व घटक संस्थेचे सर्व प्राचार्य उपस्थित होते. याप्रसंगी प्रतिष्ठान मधील अन्नपूर्णा चिंतालुरी अकॅडमीक डायरेक्टर  , आदित्य भैयारोडगेे डायरेक्टर सॅनरो प्रा. ली,क्युरीअस कीड्सच्या प्राचार्या मेरीना अवांगशी शीनी, प्रिन्स अकॅडमी मदन मानमोडे, गल्यान्सी फर्नांडीस,नारायण चौरे, अपूर्वा पॉलीटेक्निकचे प्राचार्य अशोक बोडखे, प्रिन्स आदिवासी प्रकल्प प्राचार्य विष्णू शिसोदे आदीची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें