बालाजी नागरे याच्या.स्वागत समारोह मध्ये प्रकार.
जिंतूर / निशाद आहेमद.
शहरातील साई मैदानावर कुंडलिकराव नागरे याचे चिरंजीव बालाजी नागरे याचे सुरू असलेल्या विवाह समारंभाच्या स्वागत समारोह मध्ये काम करण्यासाठी रोजंदारीने आणलेल्या एका 18 वर्षीय मुलाला कंत्राटदाराने डांबून ठेवून हातपाय बांधून बेदम मारहण केल्याची घटना दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत सदरील मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याने दिनांक 4 जानेवारी रोजी जिंतूर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील कंत्राटदार दडू सेठ व त्याचे दोन साथीदारा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत जिंतूर शहरातील खैरी प्लॉट भागात राहणाऱ्या सय्यद सोहेल सय्यद नुर या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की परभणी रस्त्यावरील साई मैदानावर दिनांक 3 जानेवारी रोजी संध्याकाळी। कुडलीकराव नागरे याच्या चिरंजीव बालाजी नागरे याचे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या स्वागत समारंभामध्ये रोजंदारीने काम करण्यासाठी जिंतूर शहरातील पप्पू किसन हरकळ,सुभाष वाकडे सुमित नवसागर या तरुणांसोबत सय्यद सोहेल ही तीनशे रुपये रोजाने काम करण्यासाठी गेला होता रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सोहेलने त्या ठिकाणी काम केले व त्याची तब्येत बरोबर नसल्याने त्याने घरी जाण्याची परवानगी कंत्राटदार यास मागितली असता त्याने उरलेले भांडे कोण धुवून देईल असे म्हणून सय्यद सोहेल यास बेदम मारहाण केली त्याच्यासोबतच्या दोन साथीदारांनी सोहेल चे हात पाय स्वयंपाक घरात फेट्याने बांधून लाकडाने थापड बुक्क्याने मारहाण केली रात्री एक वाजण्याच्या सुमारास इतर नागरिकांनी मध्यस्थी करून दडुशेठ व त्याच्या साथीदारांच्या तावडीतून त्याची सुटका केली शुक्रवार दिनांक 4 जानेवारी रोजी सय्यद सोहेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील स्वयंपाकाचा कंत्राटदार दडूशेठ व त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध जिंतूर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें