वंजारी विकास महासंघाच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपदी सुनिता सानप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 5 जनवरी 2019

वंजारी विकास महासंघाच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपदी सुनिता सानप.


शिर्डी प्रतिनिधी 
कु.किरण जाधव.


अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर येथील  सामाजिक कार्यकर्त्या सुनिता सानप यांची अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी समाज विकास महासंघाच्या महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी  सर्वानुमते निवड झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील समाजामध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले आहे.सुनिता सानप या महसूल अधिकारी बाळासाहेब सानप यांच्या पत्नी असून सामाजिक कार्यात त्या अग्रेसर आहेत.
अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी समाज विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामराव लव्हारे, महासचिव रामराव बिक्कड ,राष्ट्रीय उपाध्यक्ष यमनाजी आघाव ,प्रांत अध्यक्ष दादासाहेब ढाकणे यांच्या आदेशाने प्रदेश सरचिटणीस समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी सुनिता सानप यांना निवडीचे पत्र बहाल केले.
निवडीला उत्तर देतांनी सुनिता सानप म्हणाल्या,मी वंजारी समाजात जन्माला आल्याने समाजाची सेवा करणे,समाजाचे महिला संघटन करणे,महिलांना मान सन्मान मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे.संघटनेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून समाजसेवा करणार असे त्यांनी सांगितले.सुनिता सानप यांच्या निवडीचे महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया लक्ष्मी,महिला आघाडी  प्रांत अध्यक्षा सुष्माताई दराडे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख विजय कलेवर,प्रांत उपाध्यक्ष सुरेश ढाकणे,सुरेश हेमके,जयपाल फड,संजीव हेमके,चंद्रकांत सांगळे,भाऊसाहेब लटपटे, विठ्ठलराव तांदळे, रामकिसन सोनवणे,गोरक्षनाथ विघ्ने, किसनराव गर्जे,विकास बडे, विष्णू फुंदे,डॉ.भारती मुरकुटे,बिभीषण जायभाय,डॉ.क्रांती जाधवर,तेजस्विनी साळवे,अनुसया बिक्कड, यांनी स्वागत करून सुनिता सानप यांचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें