मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मुस्लिम समाजाचे उपोषण मागे.
सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलू येथील सारंगी गल्ली पोलिस कॉटर रोड लगत असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत इतरत्र अवैध धंदे व सुरक्षित नसल्यामुळे सदरील स्मशानभूमीला अत्याधुनिक बनवून द्यावी या मागणीकरिता सेलू येथील नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली होती लालू खान जिलानी खान रफिक बेलदार नियाजोद्दिन यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्यांना नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी लेखी आश्वासन दिले की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना तांत्रिक मान्यता देऊन मान्यता मिळताच पंधरा दिवसात स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येणारे हे उपोषण स्थगित करण्यात आले
सेलू येथील सारंगी गल्ली पोलिस कॉटर रोड लगत असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत नसल्याकारणाने जनावरांचा तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव होत होता त्यामुळे येथे दारू गांजा आदी अनाधिकृत गोष्टींना ऊत आलेला होता त्यामुळे या स्मशानभूमीला संरक्षण भिंत असणे अत्यंत गरजेचे होते या कारणामुळे सेलू येथील मुस्लिम समाजातील गेल्या अनेक दिवसांची मागणी होती की या स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधून द्यावी या कारणामुळे या तिघांनी येथील नगरपरिषदे समोर 26 जानेवारी 2019 पासून आमरण उपोषण सुरू केले होते यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी भेटी देऊन उपोषणकर्त्यांना त्यांची मागणी योग्य असल्यामुळे स्मशानभूमी अत्याधुनिक करून द्यावी याकरिता पाठिंबाही दिलेला होता तसेच सदरील स्मशानभूमीची जागा ही तोकडी पडत असून या स्मशानभूमी करीता शहरात अन्यत्र वाढीव दहा एकर जमीन देऊन नवीन स्मशानभूमी करून द्यावी अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केलेली होती या मागणीचा विचार करता सेलू येथील उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मुख्याधिकारी देविदास जाधव पंचायत समितीचे सभापती रवींद्र डासाळकर उपसभापती सुंदर गाडेकर संदीप मुरकुटे प्रसाद खारकर दीपक चव्हाण भारत पवार रंगनाथ काळे मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज एम आय एम चे तालुका अध्यक्ष इसाक पटेल रहीम पठाण माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमंतराव आडळकर कासिम भाई शेख शफिक शेख फारुख मुज्जू खान वाहेद खान ॲड विष्णू ढोले खाजा बेग विठ्ठल कोकर जावेद पठाण शिवाजी जाधव शेख खलील इत्यादींनी उपोषण स्थळी भेट देऊन सोडवण्याकरता प्रयत्न केले स्मशान भूमी करता लागणारा निधी उपलब्ध करून घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांची तांत्रिक मान्यता लागते जिल्हाधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेनंतर पंधरा दिवसातच स्मशानभूमीचे बांधकाम करता येईल असे लेखी आश्वासन यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले उपोषणकर्त्याचे उपोषण सोडतेवेळी लिंबू पाणी पाजून उपोषण सोडावयाचे असते ही तांत्रिक बाजू झाली असली तरी ही यावेळी बोलताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले की स्मशानभूमीचे बांधकाम व इतर बाबी बाबत प्रशासकीय काम असल्यामुळे मुख्याधिकारी हेच ते काम करू शकतात यामध्ये नगराध्यक्ष वगैरे गौन आहेत सेलू येथील नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदरील स्मशान भूमी बांधण्याकरिता ठराव घेण्यात आलेला होता त्या सभेतील ठराव क्रमांक 96 दिनांक 20 जून 2018 रोजी मान्यता घेण्यात आली असून सदर अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घेऊन स्मशानभूमीचे काम तात्काळ सुरू करण्यात येईल असे पत्र मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी दिलेले आहे.
या उपोषणकर्त्याला देण्यात आलेला पाठिंबा भाजपाचा पाठिंबा एम आय एम चा पाठींबा मनसेचा पाठिंबा वंचित आघाडी याचा पाठिंबा पारधी समाजाच्या वतीने पाठिंबा विविध संघटनेचा या उपोषणास पाठिंबा देण्यात आला आहे.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें