श्रीराम प्रतिष्ठान येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य रेस्क्यू ऑपरेशन, बॉंब शोधक व श्वान पथक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 जनवरी 2019

श्रीराम प्रतिष्ठान येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य रेस्क्यू ऑपरेशन, बॉंब शोधक व श्वान पथक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न.


सेलू प्रतिनिधी

सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडमी  येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम, अग्निशामक दलाचे रेस्क्यू ऑप्रेशन, बॉंब शोधक व श्वान पथक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  (ता.२६) जानेवारी वार शनिवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
यावेळी मुख्य ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  उपविभागीय  पोलीस अधिकारी रेणुका वागळे, पोलीस निरीक्षक संदिपान  शेळके साहेब, माधवबाग ओ.पि. डी व्हरटीकलचे मुख्य डॉ. दीपक कुलकर्णी, बॉंब शोधक व श्वान पथकाचे प्रमुख राम घाडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, राजेश घनसावत, अपूर्वा तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा अशोक बोडखे, प्रिन्स अकॅडमीच्या प्राचार्यां ग्लॅन्सी फर्नांडिस, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शालिनी शेळके, एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल चे प्राचार्य अलिसीया गोमॅगो, डाॅ राम रोडगे बी.एड च्या प्राचार्या डाॅ. मधुबाला बोराडे, आदित्य डि.एड. च्या प्राचार्या मिनाश्री रत्नपारखी  तसेच सर्व घटक संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी   उपस्थित  होते.
कार्यक्रमाची सुरवात मेरा देश मेरा मुल्क या देशभक्तीपर गीताने झाली. प्रिन्स अकँडमी व प्रिन्स आदिवासी प्रकल्प च्या विध्यार्थ्यानी देशभक्तीपर गीतावर नृत्य केले, अपूर्वा पॉलीटेक्निकच्या विध्यार्थ्यानी सर्जिकल स्ट्राईक,यानंतर लागलीच अग्निशामक दलाचे रेस्क्यू ऑप्रेशनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामध्ये आणीबाणी किवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर कशी मात करावी  हे प्रत्यक्ष कृती द्वारे नगर परिषद अग्निशामक दलाचे प्रमुख दिलीप दोड यांच्या मार्गदर्शनाखाली दाखविण्यात आले.
 शालेय विद्यार्थ्यांना पोलीस कार्याविषयीची माहिती, पोलीसाबद्दलची आत्मीयता वाढावी, अश्रू धुराच्या नळकांड्या , वज्र, प्लास्टिक बुलट, एस एल आर गण, कार्बाईन  शस्त्राविषयची माहिती दिली विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अनुभूती करून दिली व आपल्या मनोगतातून सखोल मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशन ला गेल्यास कशी परिस्थिती होते. याचा प्रत्यक्ष देखावा एका प्रसंगातून सर्व विध्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या मधून विध्यार्थ्यांना फिर्यादी, गुन्हेगार, तपास यंत्रणा इ. प्राथमिक संकल्पनेची माहिती प्रश्नोत्तेराच्या स्वरुपात पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे व पोलीस निरीक्षक शेळके साहेब दिली.

   परभणी येथुन आलेले बॉंब शोधक व श्वान पथक राम घाडगे यांनी आपल्या “ओरीयन” या डॉग च्या साह्याने स्फोटक व ज्वलनशील पदार्थ कुठे लपविलेले आहेत व ते कश्या पद्धतीने शोधले जातात याचे उत्तम प्रात्यक्षिकाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच बॉंब शोधक मेटेलेक जनशण, डीप सर्च मेतेलिक डीटेकटर व हँन्डल मेतेलिक डीटेकटर यंत्राच्या साह्याने पोलीस यंत्रणा काय असती हे सर्व आज जवळून पाहण्याचा योग डॉ. संजय रोडगे यांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना आला.
  विध्यार्थ्यांमध्ये देश प्रेम व राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होईल. विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अनुभूती व सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचे योजिले होते. याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी व मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तिविक डाँ.मधुबाला शेळके यांनी मांडले. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी तर आभार गजानन जाधव यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें