मोकाट कुत्र्यांनी तोडले एका पाच वर्षे बालकांचे तोंडाचे लचके.
सिल्लोड प्रतिनिधी:०५/०१/२०१९
सिल्लोड शहरातील मोकाट व उपद्रवी ठरलेल्या जनावरे , कुत्रे यांची तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे या प्रकरणी नगरपरिषद यांना कळवण्यात येते की , सिल्लोड शहरामध्ये मागील पाच ते सहा महिन्यांपासून मोकाट उपद्रवी जनावरे व कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असुन या उपद्रवी जनावरे व कुत्र्यांना वेगवेळ्या प्रकाराच्या आजाराची लागन झालेली असुन कुत्र्यांच्या संपूर्ण शरीरावर खाजेच्या खपल्या झालेल्या असून मोठ - मोठ्या जखमांमध्ये किड पडलेल्या असल्याने सदर जनावरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला आहे .एवढेच नव्हे तर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची शहरामध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली असुन शहरातील बस स्थानक परिसर , छत्तीस एकर , शिक्षक कॉलनी , म्रिझा कॉलनी , गुलशन नगर, आव्हाणा रोड ,बापुनगर परिसर , मोहम्मदिया नगर परिसर त्याच प्रमाणे शहरातील प्रत्येक गल्ली
कॉलोनीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला असून सदरील पाळीव कोंबड्या , शेळ्या यांच्यावर हमला करतात एवढेच नव्हे तर सदर उपद्रवी कुत्र्याला रक्त लागले असल्याने ते लहान मुले , वयोवृध्द व्यक्ती यांच्यासह रात्रीच्या वेळी दुचाकी धारकांवर हमला करुन चावा घेतात, ज्यामुळे शहरामध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे
.शोएब रहिम पठाण , वय ५ वर्षे रा .बापू नगर सिल्लोड या बालकावर दिनांक ०४ .०१ .२०१९ रोजी सकाळी ९ : ०० वा .सुमारास तो घरासमोर खेळत असताना परिसरातील मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हमला करून त्यास गंभीर जखमी केले असून त्याच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालु आहे .तसेच शहरामध्ये वेगवेल्या ठिकाणी कुत्र्यांनी पाळीव जनावरे व लहान मुलांवर आणि माणसांवर हमला करुन चावा घेतल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात असुन त्या अनुषंगाने सदर प्रकरणी नगरपालिकांनी तात्काळ कायदेशीर कार्यवाही करून मोकाट जनावरे व पाळीव कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा .शहरमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक का वाढली ?याची तात्काळ चौकशी करून संबधीतांवर कार्यवाही करावी .तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये योग्य तो औषधोपचार तात्काळ उपलब्ध करुन द्यावा , अन्यथा रहेमानिया सोशल ग्रुपच्या वतीने लोकशाहि मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल , यावेळी,रहेमानिया ग्रुपचेअध्यक्ष,शेख अकील,शेख फारुख, ॲडवोकेट शेख उस्मान ताहेर साहब , अ.हमीद,शेख नदीम,शेख मोहसिन,कदीर पठाण,जावेद कुरेशी, नासेर पठाण व अदि उपस्थिती होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें