कार्याध्यक्षपदी पंकज सोनी ,सचिवपदी रेवणअप्पा साळेगांवकर.
सेलू (प्रतिनिधी) शमशेर खान
दर्पण दिनानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय सेलू तालुका पत्रकार संघातील सदस्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी नुतन कार्यकारणीची बिनविरोध निवड केली असुन अध्यक्षपदी मोहम्मद ईलीयास खान यांची तर कार्याध्यक्षपदी पंकज सोनी तर सचिवपदी रेवणअप्पा साळेगांवकर यांची निवड करण्यात आली आहे.
६ जानेवारी रोजी ७ वा शासकिय विश्रामगृहात मावळते अध्यक्ष मोहन बोराडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.निवडणूक निर्वाचण अधिकारी म्हणुन जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे यांनी काम पाहिले. प्रारंभी मावळते अध्यक्ष मोहन बोराडे व सचिव रेवणअप्पा साळेगांवकर यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढाव सादर केला.त्यानंतर झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत २०१९ मधील कार्यकारणी ची बिनविरोध निवड करण्यात आली.या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष मोहम्मद ईलीयास खान ,कार्याध्यक्ष पंकज सोनी ,उपाध्यक्ष लक्ष्मण बागल ,सचिव रेवणअप्पा साळेगांवकर ,सहसचिव राहुल खपले,कोषाध्यक्ष संतोष गरड सल्लागार मोहन बोराडे ,डॉ विलास मोरे,शिवप्रसाद काबरा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून कांचन कोरडे , विलास शिंदे, अशोकराव अंभोरे,दिलीप डासाळकर ,राधाकिशन कदम ,संजय मुंढे,निसार पठाण ,मोहसिन अहेमद,दिलीप मोरे,श्रीपाद रोडगे यांचा कार्यकारणीत यांचा समावेश आहे.याप्रसंगी नुतन कार्यकारणी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
निर्णय प्रक्रिया सर्वसामावेशक असेल -मो.ईलीयास खान.
पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली असली तरी विधायक कामासाठी निर्णय प्रक्रिया हि सर्वसामावेशक असेल .संघ नोंदणी,पत्रकार भवन,नगर परीषद कडुन आरोग्यासाठी राखीव निधी यासह विविध सामाजिक कार्यासाठी मि व माझा संघ कार्यतत्पर राहिल असे मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष मो.ईलीयास खान यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे हस्ते अभिवादन सोहळा
दर्पण दिनानिमित्त सकाळी १० वा.शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परीसरात शहरातील सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत सेलू नगरीचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावनस्मृतीस व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व पत्रकारांना दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन सचिव रेवणअप्पा साळेगांवकर यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें