विश्वशांती अकोला उपविजेता.
सोनपेठ मंजूर मूल्ला / येथील शारदा नगर मैदानावर शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विश्वशांती अकोला संघावर विजय मिळवत जय भवानी थार संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर विश्वशांती अकोला संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.नगरसेवक अँड श्नीकांत भैया मित्र मंळाच्या वतिने सलग पाच वर्षापासुन शहरातील शरदा मैदान येते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित क्रिकेट स्पर्धाचे अयोजन करण्यात येते याहि वर्षी ठेवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिला पारितोषिक जय भवानी थार यांनी फटकावले तर अकोला संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले यानंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून दशरथ सुर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख, पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट, उप नगराध्यक्ष दत्ताराव कदम,राठोड, मदनराव विटेकर, डिगांबर पाटील, डाॕ. श्रीनिवास गुळभिले, विनोद चिमणगुंडे, सुनिल बर्वे, रामप्रसाद यादव, भुजंगराव हुंबे, अशोकराव यादव, विनोद चिमणगुंडे, अमर वडकर, परमेश्वर कदम, बाळासाहेब बुरांडे, शिवाजी भोसले, श्रीकांत मोरे, उत्तम शिंदे आदीची यावेळी उपस्थिती होती.
या अंतीम सामन्यात विश्वशांती अकोला संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ फटकात 68 धावा केल्या होत्या. तर जय भवानी थार संघाने सात फटकात चार गड्याच्या मोबदल्यात विजयी लक्ष पार केले. अंतीम सामन्याचे सामनाविर तानाजी, मालीकाविर रामदास सिरसाट, उत्कृष्ट गोलंदाज केतन भवरे, उत्कृष्ट फलंदाज मुस्ताक शेख, हे मानकरी ठरले आहेत. सुञसंचालन संदिप लष्करे यांनी तर या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अँड श्रीकांत विटेकर, सोमनाथ रेडे, गजानन देवरे, कोंडीबा पांढरे, अजित राठोड, गिरीष हालगे, प्रविण रोडे, गणेश चव्हाण, उत्तम भोसले, आदीनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें