समाजाला न्याय देण्याच्या कामात पत्रकारांचे योगदान मोठे ..उपसरपंच अजय जगताप . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

समाजाला न्याय देण्याच्या कामात पत्रकारांचे योगदान मोठे ..उपसरपंच अजय जगताप .




शिर्डी प्रतिनिधी 
कु.किरण जाधव


शिर्डी लगत असलेले निमंगाव कोऱ्हाळे गावात ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यांत आला
या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष श्रध्दा सबुरीचे चेअरमन राजेंद्र गाडेकर. उपसरपंच अजय जगताप.माजी उपसरपंच विजय कातोरे.कैलास कातोरे. ग्रामपंचायत सदस्य मनोज वदक.रघुनाथ कातोरे.नारायण गाडेकर.कैलास गाडेकर.सिकंदर शेख.आदीसह विविध मान्यवर हजर होते.
या वेळी बोलतांना उपसरपंच अजय जगताप म्हणाले ग्रामीण भागात राजकीय पदावर काम करतांना व विकासाचे प्रश्न मार्गी लावतांना ते जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसिध्द माध्यम फार महत्वाची जबाबदारी पार पाडतात त्याच पत्रकारांची भुमिका महत्वाची असते त्यात असलेले योगदान यामुळेच जनते पर्यंत काम पोहचत असते यामुळेच लोकशाहीत पत्रकार चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जातो आज याठिकाणी पत्रकार दिन साजरा करतांना मोठे समाधान वाटत असल्याचे सांगितले या वेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या वेळी पत्रकार किशोर पाटणी.राजेंद्र दुनबळे.हेमंत शेजवळ.अमोल वाघमारे.राहुल फुंदे यांचा शाल श्रीफळ व साईप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला बि के जगताप.रविंद्र सोळसे.उत्तमराव खरात.राजेंद्र जगताप.रविंद्र जगताप.राम कातोरे.संजय लोंढे.रविंद्र माळी.आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें