अभिनेते अनुपम खेर सध्या आपला आगामी चित्रपट ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान अभिनेता अनुपम खेर यांच्याविरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत ही तक्रार करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही तक्रार दाखल केलीआहे. न्यायालयाने तक्रार दाखल करुन घेतली असून 8 जानेवारीला उप विभागीय न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत केलेल्या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटलं असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें