बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 24 जनवरी 2019

बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी

सेलू येथील नगर परिषदेत  खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी अद्याप ही गुलदस्त्यातच असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकारी यांना चौकशीकरिता दोन पत्रे देऊन देखील अद्यापही या प्रकरणात कुठलीच कार्यवाही झालेली नाही
याबाबतची तक्रार तसेच वृत्तपत्रात बातमी येताच 11 जुलै 2018 रोजी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष न प सेलू यांनी तात्काळ बैठक घेऊन सदरील कर्मचाऱ्यास काढून टाकण्याचा ठराव घेऊन तात्काळ त्यास कामावर न येण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र 1 जानेवारी 18 ते जून 18 सहा महिन्याचा पगार वेतन त्यात दिलेले आहे त्याचा प्रश्न कायम असून सदरील कर्मचारी हा पाथरी येथे मुकादम या पदावर कार्यरत होता असे दाखवण्यात आले तसेच त्याबाबतची सर्व कागदपत्रे बनावट पद्धतीने बनवून त्या कर्मचाऱ्यास सेलू येथील नगर परिषदेत मुकादम या पदावर घेण्याचा ठराव सेलू नगरपरिषदेने घेतला होता व त्यास 4440 ते सोळाशे ग्रेड  पेवर घेण्याचे आदेश मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी देऊन सदरील हितसंबंधी कर्मचाऱ्यास नगरपरिषदेत घेतले होते मात्र येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे तक्रार करतात वृत्तपत्रात येतात सेलू नगरपरिषद खडबडून जागी झाली आणि त्यांनी तात्काळ ठराव घेऊन या बनावट प्रकरणातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र याबाबत मात्र याबाबतची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात असून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव तसेच बनावट कर्मचारी शेख शफी शेख मुजीब या दोघांविरुद्ध ही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे मात्र गेल्या सहा महिन्यापासून अद्यापही या प्रकरणात कुठल्याच प्रकारची चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही त्यामुळे परभणी येथील जिल्हा प्रशासन अधिकारी सदरील प्रकरण गुंडाळून टाकतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे तरी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन तत्काळ या प्रकरणात कार्यवाही करावी अशी मागणी होत असून सदरील कर्मचाऱ्याकडून त्यास दिलेले सहा महिन्याचे वेतन  वसूल करण्यात यावे आहे सदरील प्रकरणातील बनावट कर्मचारी शेख शफी शेख मुजीब हा पाथरी येथील नगर परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुपये आठ हजार या वेतनावर काम करत होता असे पत्र देखील नगरपरिषद पाथरीचे मुख्याधिकारी यांनी दिलेले आहे तसेच सदरील कर्मचारी हा सेलू येथे 1 जानेवारी ते जून 18 पर्यंत मुकादम या पदावर कार्यरत असल्याचे भासवून शासनाचे आर्थिक नुकसान व दिशाभूल केली आहे तसेच पाथरी येथे ही शेख शफी शेख मुजीब या कर्मचाऱ्यांनी मार्च 18 पर्यंत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केलेले आहे या आशयाचे पत्र नगरपालिका यांनी दिलेले आहे त्यामुळे शासनाची फसवणूक मुख्याधिकारी जाधव हे सर्व माहिती असतानादेखील या कर्मचाऱ्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें